कर्जत : मतदान केंद्राच्या पासून काही अंतरावर रस्त्यावर दूध ओतून व गळ्यामध्ये कांद्याची माळ घालत केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध करत कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे शेतकरी रामदास लाळगे यांनी निषेध करून नंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. दुधासाठी राज्य सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, अनेक खासगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांची सुधारित माहिती देण्यास उशीर केला. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळाले नाही. काही शेतकऱ्यांना अनुदान आले, तर काही जणांना मिळाले नाही. काही जणांना अनुदान अल्प मिळाले. तसेच कांद्याची निर्यात रोखल्यामुळे कांद्याला अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही. याचा निषेध म्हणून कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी रामदास लाळगे यांनी मतदानाला जाण्यापूर्वी रस्त्यावर दूध ओतून दुधाला भाव नसल्याबद्दल सरकारचा निषेध केला आणि नंतर ते मतदानासाठी गेले.
Home नगर जिल्हा रस्त्यावर दूध ओतले, गळ्यात कांद्याची माळ घातली… निषेध करीत नगरमध्ये शेतकऱ्याचे मतदान…