नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे गरजले… म्हणाले, शरद पवारांना भेटण्याचा प्रश्नच नाही…

0
42

विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजीराव गर्जे यांच्यावर राष्ट्रवादीची कागदपत्रे चोरल्याचा आरोप होता. त्यावरही ते मीडियाशी बोलले.विजयानंतर शरद पवार यांना भेटण्याचा प्रश्न येत नाही. माझं सर्वस्व अजित पवार आहेत, असंही शिवाजीराव गर्जे यांनी स्पष्ट केले.

गर्जे म्हणाले, मी कागदपत्रे चोरली नाहीत. माझ्यावर दोन आमदार टीका करतात. परंतु त्यांनी समजून घ्यावं अजित पवार गटनेते होते. त्यामुळे मी त्यानाच कागदपत्र दिली कारण त्यांचा तो अधिकार होता. माझ्यावर सातत्याने दोन आमदार टिका करतात. त्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यायला हवी उगाचच चुकीची चर्चा करत राहतात. माझ्या विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचं आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काम करत रहाणार आहे. विजयानंतर शरद पवार यांना भेटण्याचा प्रश्न येत नाही. माझं सर्वस्व अजित पवार आहेत, असंही शिवाजीराव गर्जे यांनी स्पष्ट केलं.