नगर शहरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते शुभारंभ

0
17

नगर शहरात मनपाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निर्णय क्रांतिकारी – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

नगर : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मंजूर केली असून महिलांचे आर्थिक स्तर उंचविण्यासाठी मदत होईल याचबरोबर आपल्या कुटुंबाला हातभार लावता येईल व महिलांचे सक्षमीकरणासाठी पाठबळ मिळेल नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी दोन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे, या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे, ही योजना पारदर्शकपणे राबवली जात असून थेट महिलेच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहे, अहमदनगर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी मदत केंद्र उभारले आहे तरी महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले
नगर शहरात मनपाच्या वतीने केडगाव देवी परिसर येथे राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, प्रसिद्धी प्रमुख अधिकारी शशिकांत नजान, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, नाना गोसावी, सुखदेव गुंड, अजित कोतकर आदीसह अधिकारी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नगर शहरात यशस्वीपणे राबवली जात असून महिलांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी 16 मदत केंद्र तयार केले असून ठिकठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे. अंगणवाडी सेविका नगर शहरांमध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन अर्ज भरून घेत आहे या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाईल असे ते म्हणाले.
यावेळी माजी सभापती मनोज कोतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

महापालिकेच्या वतीने केडगाव देवी परिसर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी जिल्हाधिकारी यांनी थेट महिलांशी संवाद साधत योजनेची माहिती दिली तसेच महिलांचे मोबाईलवर ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी थेट मोबाईलवरच महिलेचा फोटो काढत साइटवरअपलोड केला, जिल्हाधिकारी यांचे साधेपणा पाहून महिला भारवल्या यावेळी महिलांनी एकमेकीशी संवाद साधत जिल्हाधिकारी यांचे माणुसकीचे दर्शन घडले असल्याची चर्चा केली