Gold- Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण ,जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

0
47

Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. मुंबईसह राज्यभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६८,८२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८२,२९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,०२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.