अहमदनगर मनपा कर्मचारी युनियन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी न लागल्यास 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण – अध्यक्ष जितेंद्र सारसर.
नगर – मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवण्याचे काम युनियन करत आहे. मनपा कर्मचारी आणि युनियन पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडून घेण्यासाठी मदत होत असते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असला कर्मचाऱ्यांचा वारस हक्क नोकरीचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच त्यांना नोकरीवर हजर करून घेतले जाईल. युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन करून मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून महापालिकेत काम करण्यासाठी मदत होत असते. अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षाचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित असून तो येत्या 15 ऑगस्ट पर्यंत मार्गी न लागल्यास अहमदनगर मनपा कर्मचारी युनियन चे पदाधिकारी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी दिला.
अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावल्याबद्दल प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी आरोग्य विभागाच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल व जितेंद्र सारसर, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष नंदकुमार नेमाने, कार्याध्यक्ष राहुल साबळे, महादेव कोतकर, उपाध्यक्ष अमोल लहारे, भास्कर अकुबत्तीन, सागर सालुंके, प्रभाग अधिकारी शाम गोडळकर ,आदींसह आयोजक राजकुमार सारसर, भाऊ वैराळ, प्रशांत रामदीन, परीक्षित बिडकर, . रणजीत सारवान संदीप चव्हाण, गोरक्षनाथ देठे, संजय चाबुकस्वार, रविंद्र वाघमारे, राजेंद्र शिंदे, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.
बाबासाहेब मुदगल म्हणाले की, मनपा युनियन आणि कर्मचारी हे एका कुटुंबातील असून आपण सर्वजण मिळून मनपाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करू त्यांना अधिक-अधिक चांगल्या सुविधा देऊ व महापालिकेचा नावलौकिक वाढवू आरोग्य विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाले आहे. त्याबद्दल आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आहे असे ते म्हणाले.
सचिव आनंद वायकर म्हणाले की मनपा कर्मचाऱ्यांनी एकजूट असणे गरजेचे आहे. त्यांनी देखील पुढे येऊन युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी. कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले. त्यांला यश देखील आले आहेत. सातवा वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो सोडवण्यासाठी आमचे काम सुरू आहे असे ते म्हणाले.,