टाकळी ढोकेश्वर जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ,ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0
33

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीमध्ये प्रवेशासाठी

16 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर दि. 2 ऑगस्ट :- जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे इयत्ता 6 वीमध्ये प्रवेशासाठी प्रकिया सुरु करण्यात आली असुन प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख 16 सप्टेंबर, 2024 अशी आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरुन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://www.navodaya.gov.in/nvs/nvs- school/Ahmednagar/en/home/ व https://navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-class/ या संकेतस्थळाचा वापर करण्यात यावा. याबाबत 18 जानेवारी, 2025 रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.