विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा अनाकलनीय… प्राजक्त तनपुरेंनी शुक्रवारी बोलवला मेळावा

0
21

आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एका कठीण परिस्थितीतून जात असताना आपले प्रेरणास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी पुन्हा एकदा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. द्वेषाचे राजकारण पसरवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाराष्ट्र धर्म राखण्याचा लढा स्वीकारला. सत्य, न्याय आणि विकास ही तत्वे अंगीकारत त्यांच्या सोबत आम्ही उभे राहिलो. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे योगदान अमूल्य आहे.

एका बाजूने साम, दाम, दंड, भेद सर्वच गोष्टींचा वापर होत असताना माझी लोकं सावलीसारखी माझ्या सोबत राहिली. विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा अनाकलनीय आहे. तो विवेक बुद्धीला पटणारा नाही. पण माझी लोकं माझ्या सोबत आहेत याचे समाधान वाटते.

आपल्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यासाठी उद्या दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय, राहुरी येथे आपणास भेटतो आहे.

नक्की या!

https://x.com/prajaktdada/status/1862051832115368015