बिनबोभाट वाळू वाहतुकीसाठी दीड लाखांची लाच, तहसीलदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

0
813

तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यासाठी व कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी एका व्यक्तीकडे प्रति ट्रक तीस हजारांची मागणी निलंगा तालुक्यातील तहसीलदार तहसिलदार गणेश जाधव यांनी केली होती. त्यानूसार मागील तीन महिन्याचे एकूण एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तहसीलदार गणेश जाधव यांच्या घरासमोर स्वतः गणेश दिगंबरराव जाधव आणि खाजगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे यांना ही रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.