दोन दिवस नॉट रिचेबल असलेले अजितदादा पुन्हा ॲक्शनमध्ये, भेटीसाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी

0
30

महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल झाले होते. अखेर आता अजित पवार दोन दिवस गायब का होते, याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.

अजित पवार हे आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत. अजित पवारांना घशाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे ते दोन दिवस आराम करत होते. यामुळे ते अधिवेशनात अनुपस्थित होते. मात्र आता दोन दिवसांनी अजित पवार हे विधिमंडळात दाखल होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी अंसख्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.गेले दोन दिवस अजित पवार हे नॉट रिचेबल होते, पण आज ते कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्यांनी शासकीय निवासस्थानी आराम केला, अशी माहिती पक्षाकडून देण्यात येत आहे.