अहमदनगरमध्ये विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासु सासर्‍यावर गुन्हा दाखल

0
18

जामखेड -सासरकडील लोकांनकडुन पैशासाठी वारंवार होत आसलेल्या छळास कंटाळून विवाहित महीलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरकडील पती, सासरे व सासु आशा तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती व सासरा यांना अटक केली आहे. शंकर भानुदास जाधव (पती) भानुदास केशव जाधव (सासरे) जयश्री भानुदास जाधव (सासू) आशा सासरकडील तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी की मयत मिनाक्षी शंकर जाधव वय वय २४ वर्षे रा. पोकळे वस्ती. जामखेड हीचा दि २ डीसेंबर २०१९ रोजी म्हणजे पाच वर्षान पुर्वी आरोपी पती शंकर भानुदास जाधव याच्या सोबत विवाह झाला होता. मिनाक्षी ही सासरी नांदत आसताना पुर्वी तीला मुल होत नाही म्हणून छळ केला जात होता.

यानंतर तीला काही वर्षांनी मुलगा झाला. मात्र तरी देखील मिनाक्षी हीचा सासरकडील लोकांनकडुन तु माहेरुन पैसै आण आसे म्हणून तीला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या बाबत मिनाक्षी हीने माझा सासरी छळ होत आहे आसे देखील माहेरकडील लोकांना सांगितले होते. मात्र तीचा छाळ काही कमी होत नव्हता. आखेर मिनाक्षी हीने या छळास कंटाळून दि ३० जानेवारी २०२४ रोजी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिनाक्षी हीला एक वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलीस दिलेल्या फिर्यादीवरून शंकर भानुदास जाधव (पती) भानुदास केशव जाधव (सासरे) जयश्री भानुदास जाधव (सासू) रा. पोकळे वस्ती, जामखेड आशा सासरकडील तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती व सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.