Ahmednagar news :शेतकर्‍याची पावणेदोन कोटींची फसवणूक, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

0
12

अहमदनगर-संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील एका शेतकर्‍याची दिल्ली येथील एकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सायखिंडी येथील दत्तात्रय शंकर पवार (वय 37) यांच्याकडून दिल्ली येथील कुशादेव बुझबुराह याने एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 याकाळात 3 कोटी 68 लाख 7 हजार 750 रुपये रक्कम घेतली होती.

त्यातील 1 कोटी 84 लाख 41 हजार 750 रुपये इतकी रक्कम परत केली. परंतु, पवार यांचा विश्वास संपादन करून उर्वरित 1 कोटी 83 लाख 66 हजार रुपयांची रक्कम परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी पोलीस ठाणे गाठत आपली कैफियत मांडली. यावरून शहर पोलिसांनी कुशादेव बुझबुराह याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक फडोळ करत आहेत.