एका पठ्ठ्याने भन्नाट आयडिया वापरली ,गहू निवडण्यासाठी केला कूलर आणि स्टूलचा उपयोग..व्हिडिओ

0
1150

गहू निवडणं एक आव्हानात्मक कामच मानायलं हवं. गव्हातून खडे निवडणं म्हणजे अनेकांसाठी डोळ्यांची एक परीक्षाच असते. मात्र, गहू निवडण्यासाठी एका पठ्ठ्याने भन्नाट आयडिया वापरली आहे. या पठ्ठ्याने गहू वापरण्यासाठी चक्क कूलर आणि स्टूल वापरला आहे. हा भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
गहू निवडण्यासाठी पंख्याचा वापर केला जातो. हाताने गहू पंख्यासमोर हळूहळू फेकला जातो. मात्र, आता एका पठ्ठ्याने कूलर आणि स्टूलच्या मदतीने गहू निवडण्यासाठी देशी जुगाड केला आहे. या पठ्ठ्याचा देशी जुगाड नेटकऱ्यांना प्रचंड पसंत पडला आहे गहू निवडण्यासाठी कूलरवर स्टूल ठेवला आहे. या स्टूलमधून हा गहू खाली पडतोय, त्यानंतर दुसऱ्या जागी पडून पडला जात आहे. ही भन्नाट आयडिया वापरण्यासाठी एक स्टूल आणि त्याला छिद्र आहे. त्याचबरोबर एक कूलर हवा आहे.