video: ‘प्रेमाची लागली भन्नाट’ आजोबांनी शेतातच धरला ठेका, पाहून आज्जीही…

0
77

एक आजोबा शेतात मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे.
‘प्रेमाची लागली भन्नाट’ या गाण्यावर आजोबांनी चांगला डान्स केला आहे. त्या व्हिडीओमध्ये आजोबांची स्टेप्स आणि एनर्जी दोन्हीही दिसत आहेत. आजोबांचा डान्स पाहून बाजूला असलेल्या आजीही लाजत आहेत. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे. पाऊस पडला म्हणून आजोबांना आनंद झाला, त्यामुळे आजोबा शेतातच नाचायला लागले आहे. असं कॅप्शनमध्ये लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य येईल.