Saturday, May 18, 2024

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारावर दु:खाचा डोंगर

अहमदनगर-विहीरीतील विज पंप दुरूस्तीचे काम करत असताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील साकत गावच्या शिवारात घडली. विकास दत्तात्रय वाघमोडे (वय ३०, रा. साकत ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. मयत विकास हा नगर दक्षिण लोकसभा निवडणुक लढविणारे अपक्ष उमेदवार दत्तात्रय आप्पा वाघमोडे यांचा मुलगा आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकास वाघमोडे हे बुधवारी (दि. १) सायंकाळी विहिरीतील विज मोटार दुरूस्तीचे काम करत असताना त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तात्कळ उपचारासाठी त्यांचे नातेवाईक सोमनाथ राजाराम चितळकर यांनी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबतची खबर नगर तालुका पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अंमलदार आर. व्ही. गांगुर्डे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles