Video : धक्कादायक! क्रिकेटच्या मैदानात खेळाडूचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
15

हा व्हायरल व्हिडीओ एका क्रिकेटच्या मैदानावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मैदानावर दोन क्रिकेटर फलंदाजी करताना दिसत आहे. त्यापैकी एक क्रिकेटर फलंदाजी करताना चौकार मारतो तेव्हा दुसरा फलंदाज त्याचे अभिनंदन करायला त्याच्याजवळ जातो आणि त्याचे अभिनंदन करतो पण अभिनंदन केल्यानंतर अचानक दुसरा फलंदाज खाली पडतो. फलंदाजाला असं खाली पडताना पाहून मैदानावरील क्रिकेटर, अंपायर आणि इतर लोकं धावून येतात. तेव्हा
सर्वांना कळते की त्याला हार्ट अटॅक आला आहे. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते पण डॉक्टर मात्र त्याला मृत घोषित करतात. दिल्लीच्या नोएडा येथील ही घटना आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. आजवर अनेकदा क्रिकेट खेळताना दुखापतीमुळे काही क्रिकेटरचा मृत्यू झाल्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण असा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची घटना क्वचितच तुम्ही ऐकली असेल.