नगर कल्याण रोड वरुन अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
58

कल्याण रोड वरुन अल्पवयीन मुलीचे अपहरण
नगर – नगर कल्याण रोडवर शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
अल्पवयीन मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच तिच्या घरच्यांनी तिचा गल्लीतील परिसरात आजूबाजूला जाऊन शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. यावरून त्यांची खात्री झाली की अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून तिला पळवून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अपहृत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरुन अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली.