नांदेड : bribe arrest अकरा हजार रुपयांची लाच ताना नांदेडमध्ये पीएसआयला रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याला अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख नाजीर हुसेन यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी त्यांनी अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. लाच घेताना पीएसआय हुसेन यांना एसीबीने रंगेहाथ बेड्या ठोकल्या.
57 वर्षीय शेख नजीर हुसेन आमिर हजमा हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस स्टेशनमध्ये त्याची पोस्टिंग आहे.आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराच्या मामा विरुद्ध उमरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात मदत केली म्हणून आणि गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी 11 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे.






