आदित्य ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात मोठे शक्तिप्रदर्शन… शिर्डीतील मेळाव्यात बंडखोरांना फटकारले

0
880

शिर्डीतील मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर अतिशय कडक टीका केली आहे. वडील आजारी आणि संकटात असताना यांनी स्वत: पुढे येवून साथ देण अपेक्षीत होत मात्र यांनी माझ्या वडीलांसोबत गद्दारी केली. त्यांच्या पाठीत खंजिर खूपसला असून आता या बंडखोरांच्या कपाळी गद्दारीचा शिक्का बसला आहे जो कधीच मिटणार नाही.

साईबाबांचे वस्त्र आणि नाव अंगावर आहे मी कधीच खोट बोलत नाही. गद्दार नेहमी म्हणतात ना की, उद्धव ठाकरे भेटत नव्हते हे खरं आहे. कारण दिवाळीनंतर त्यांची दोन शस्त्रक्रिया झाली होती. तरी त्यांनी काम सुरू ठेवले. एकीकडे उद्धवसाहेब कोविडमधून महाराष्ट्र बाहेर कसा काढायचा याचं काम करत होते तर दुसरीकडे हे गद्दार फोडाफो़डी करत होते. तरी ही माझ्या मनात त्यांच्या विषयी राग , व्देष नाही तर दुख आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच तर नाव ही घ्यावं वाटत नाही. मागील पाच वर्षात ते शिर्डी लोकसभा मतदार संघात दिसलेच नाही तरी त्यावेळी लोकसभेला मी त्यांच्या वतीनं जनतेची माफी मागितली. तेव्हा ते कुठं मुंबईत बसत होते ते त्यांनाच माहीत आपल्याला त्यात जायचं नाही असं म्हणत खासदार लोखंडे यांचा ही चांगलाच समाचार घेतला.