चौंडीतील अहिल्यादेवींचा जन्मोत्सव हा तर राष्ट्रवादीचा मेळावा… माजी मंत्री राम शिंदे आ.रोहित पवारांवर बरसले!

0
648

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रोहित पवार यांच्या जोरदार टीका केली. ते म्हणाले की, या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं स्वरूप या वर्षी जरा वेगळं आहे. दरवर्षी कुठला पक्षीय अभिनिवेश, झेंडा न ठेवता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अहिल्यादेवींच्या चरणी निष्ठा आणि भक्ती ठेवून राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने जयंती उत्सवात सहभागी होतात. जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून त्याचे नियोजन मी करत असतो. सर्व संघटना आणि राजकीय पक्षांच्या लोकांना त्यात समाष्ठि करून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण, या वर्षी समितीची कुठलीही बैठक घेतली नाही. प्रशासनावर दबाव आणि दडपशाहीचे धोरण राष्ट्रवादीने राबविले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करत प्रशासनाला हाताशी धरून जयंती उत्सवाची कुणालाही परवानगी दिली नाही. मी गेल्या अनेक दिवसांपासून जयंतीनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतो. त्या महाप्रसादालाही स्थानिक आमदार रोहित पवारांनी आडकाठी आणली. महाप्रसादासाठी जो मंडप घालण्यात आलेला होता, तोही काढून टाकण्यात आला. कोणालाही विश्वासात न घेता ते जयंती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, ती जयंती नसून तो राष्ट्रवादीचा मेळावा आहे. असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले.