अहिल्या नगर शहरातील व्यापार्यांच्या नगर तालुक्यातील शेत जमिनींवर ताबा मारण्याचे प्रकार समोर येत आहे. मार्केट यार्ड, कोठी रस्ता येथील सुदर्शन डुंगरवाला यांच्या नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील शेतीवर ताबा मारल्याचा प्रकार ताजा असतानाच व्यापारी अनिल वालचंद गांधी (वय 60 रा. सिताबन लॉन, कोठी रस्ता, अहिल्यानगर) यांच्या वाटेफळ (ता. नगर) शिवारातील शेत जमिनीवर आठ ते दहा महिलांनी ताबा मारला आहे.
दरम्यान, या प्रकरणी अनिल गांधी यांनी गुरूवारी (9 जानेवावरी) दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी आठ ते दहा महिलांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल यांची वाटेफळ शिवारात शेत गट नंबर 60 मध्ये शेती आहे. त्या ठिकाणी अनोळखी आठ ते दहा महिलांनी पाल ठोकून ताबा मारला आहे. शेतात अनाधिकृतपणे अतिक्रमण का केले अशी विचारणा करण्यासाठी अनिल 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास गेले असता त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. नगर शहरातील ताबामारीचे लोन नगर तालुक्यात देखील पसरले आहे. अधीक्षक ओला यांच्या आदेशामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल होत आहे.







Vyapari SUKHLAL Navalmal Pipada family land 7.5 acre land since 2008 at Jalkye Khurd NEWASA taluka
Encroached by Raju sultan Pathan , Haytu Sultan Pathan , Humayun Sultan Pathan and all their family
Even after high court order for police protection Pathan family day before yesterday night took away in midnight all harvest of Tur
Pathan family says if Pipada family Ur any one comes near or on this land 193/3 and 193/4 he will go home without legs and hands
More truth in this you can find this is happening on stead fast level and has no solution
Sushil SUKHLAL Pipada
Comments are closed.