मनपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी बलराज गायकवाड तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब गंगेकर यांची निवड

0
35

मनपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी बलराज गायकवाड तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब गंगेकर यांची निवड झाल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार संपन्न

मनपा कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात पतसंस्थेचा सहभाग कौतुकास्पद – आ.संग्राम जगताप

नगर : अहिल्यानगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेला एक उज्वल परंपरा असून संचालक मंडळ सभासदांच्या हिताचे निर्णय घेत असून मनपा कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी व लग्न समारंभासाठी तातडीने कर्जरूपी आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहे, याचबरोबर आरोग्याच्या उपचारासाठी 25 हजाराची तातडीने मदत केली जाते, तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार करून शाब्बासकीची थाप देण्याचे काम केले जात आहे, मनपा कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच पतसंस्थेचा सहभाग असून हे कौतुकास्पद आहे, सभासदांना बरोबर घेऊन पतसंस्थेच्या सुरू असलेल्या कारभारामुळे यशाचे शिखर गाठले जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहिल्यानगर मनपा सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बलराज गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब गंगेकर यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, संचालक सोमनाथ सोनवणे, कैलास चावरे आदी उपस्थित होते.

चौकट : मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आ. संग्राम जगताप नेहमीच सहकार्य करीत ते सोडविण्याचे काम करत असतात ते नेहमीच आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असल्यामुळे आम्हाला देखील चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते आणि मिळालेल्या पदाच्या माध्यमातून मनपा पतसंस्थेचे सभासद व कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करत आहे संचालक मंडळांनी टाकलेला विश्वास आम्ही दोघे सार्थ करूअशी भावना चेअरमन बलराज गायकवाड यांनी व्यक्त केली.