महापालिका प्रभाग कार्यालय जप्ती पथकाकडून चार गाळे सील व चार नळ कनेक्शन कट
नागरिकांनी कर भरून जप्ती पथकाची कारवाई टाळावी – प्रभाग अधिकारी बबन काळे
अहिल्यानगर महापालिका हद्दीमधील नागरिकांनी आपला चालू व थकीत कर तातडीने भरून घ्यावा व जप्ती पथकाची कारवाई टाळावी आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशाने शहरातील थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करत असून बालिकाश्रम रोडवरील फकीर मोहम्मद नूर मोहम्मद बागवान व इतर यांच्या मालकीचे चार गाळे सील केले असून ४ नळ कनेक्शन कट केले आहे, सुमारे तीन लाख 35 हजार 350 रु. कर भरण्याचे आदेश यावेळी दिले आहे आयुक्त डांगे यांनी करावर लावलेली शास्ती 100% माफ केले असून 15 तारखेच्या आत सर्व करदात्यांनी आपला कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन सावेडी प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी केले
महापालिका प्रभाग कार्यालय जप्ती पथकाकडून चार गाळे सील व चार नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई चावडी प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी केली यावेळी कर निरीक्षक ऋषिकेश लखपती, नंदा भिंगारदिवे, अजय कांबळे, संजय तारडे, संदीप कोलते, किशोर जाधव, सागर जाधव, मंजाबापू लहारे, किशोर देठे, गोरख ठुबे, राजेश आनंद, रफिक देशमुख आदी उपस्थित होते.