ग्रामीण पाणी पुरवठा विभागात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध ..व असल्या निंदनीय घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत
सीईओ आशिष येरेकर ..
आज ग्रामीण पानी पुरवठा विभाग जिल्हा परिषद् अहमदनगर येथे पोटे यांनी केलेल्या हल्ल्याचा जिल्हा परिषद् प्रशासन तीव्र निषेध करत असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे केल्याची माहिती सीईओ श्री आशिष येरेकर यांनी दिली आहे .
संबंधित हल्लेखोर यांनी जिल्हा परिषदेला केलेल्या तक्रार अर्जावर जिल्हा प्रशासनाने यापुर्वीच कार्यवाही केलेली असून कोल्हेवाडी व् हातवलण या दोन्ही ठिकाणी टाटा Const. Services या त्रयस्थ यंत्रणे मार्फत तपासणी गावचे सरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थ कोल्हेवाडी यांचे उपस्थितीत दि. १२/१२/२०२३ केलेली असून तक्रार अर्जाच्या अनुषंगाने ग्राम पंचायत कोल्हेवाडी यांनी योजनेचे काम समाधान कारक असा अहवाल आहे . तसेच ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग अहमदनगर जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कडून अहवाल मागवला आहे.त्यामुळे दोन महिने कुठलीही कार्यवाही जिल्हा परिषद मार्फत झाली नाही असे बोलणे चुकीचे असून प्रशासनाची जाणीवपूर्वक बदनामी करुन अधिकारी , कर्मचारी यांचेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संबंधितांनी केल्याचा दिसतो .प्रशासन असल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवित असून नियमानुसार काम करत राहणार असल्याचे येरेकर यांनी सांगितले .
कार्यकारी अभियंता श्री गडधे हे मित्रा नाशिक येथे दि १५/१ पासून १९/१ पर्यंत ट्रेनिंग साठी उपस्थित असल्याने तात्पुरता कार्यभार श्री गायसमुद्रे यांचेकडे सोपविण्यात आला होता . संबंधित हल्लेखोर हे वारंवार तक्रार करुन प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम करत आहेत.त्यामागे निश्चितच त्यांचा हेतु प्रामाणिक आढळून येत नाही . प्रसिध्दी मिळविण्यासाठी हा प्रयत्न संबंधितांनी केल्याचा दिसून येते .
ZP सांभाळता येईना अन् कसा जिल्हा सांभाळणार??
Comments are closed.