अहमदनगरमध्ये एसटी बस जागीच पलटी, ४० शाळकरी विद्यार्थी जमखी

0
14

अहमदनगर येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. बस जागीच पलटी झाल्याने यातील काही शालेय विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आलेत.
अहमदनगरमधील संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती. वाटेतच बसचे एक्सेल तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली. एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी ४० विद्यार्थी जखमीअपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात बस पोहचली त्यावेळी हा अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने गावातील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले होते. बस अपघाताची माहिती मिळताच मुलांच्या पालकांना ही माहिती कळवण्यात आली. आपल्या लेकरांच्या काळजीने आई वडिलांचा जीव कासावीस झाला होता. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला पाठवले आहे.