नगर प्रतिनिधी : अहमदनगर महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य असे आहे की नगरकरांना निरंतर सेवा द्यायची आहे त्यानुसार उपयोजना होणे गरजेचे आहे संपूर्ण नगर शहराला दिवसाआड पाणी देण्यासाठीचे नियोजन करा अनाधिकृत नळ कनेक्शनची माहीम हाती घेऊन सात दिवसात अहवाल द्या त्यानंतर नळ तोडणी मोहीम राबवावी कोणालाही घाबरायचे कारण नाही जे कोणी मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करेल त्याच्यावर 353 चा गुन्हा दाखल करण्यात येईल प्रत्येक नगरकरांशी कर्मचाऱ्यांनी समंजसेने व प्रेमाने वाघा अमृत पाणी योजनेचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून फेज टू पाणी पाणी योजना संपूर्ण शहरात कार्यान्वित करा व जुन्या पाईपलाईन बंद करा नगरकरांनी फेज टू पाणी योजनेचे नळ कनेक्शन घेण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून नगरकरांना स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल नगर शहर पूर्णपणे टँकर मुक्त करायचे आहे यासाठी पाणीपुरवठा विभागाने चोखपणे काम करावे कामात दीर्घाई व हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई करण्यात येईल पाणीपुरवठ्याचा खर्च व वसुलीमध्ये मोठी तफावत आहे यासाठी पाणीपट्टी भरण्याचे नागरिकांकडून नियोजन करावे
मुकुंद नगर भागाला दिवसाआड पाणी देण्यासाठी फेज टू पाणी योजना कार्यान्वित करा मुकुंद नगर मधील पाण्याची टाकी भरावी मुकुंद नगर मधील सुमारे 1000 नळ कनेक्शन अनधिकृत आहे तरी ही नळ कनेक्शन नियमितपणे करून घ्यावे अन्यथा नळ कनेक्शन तोडणी मोहीम राबविण्यात येणार आहे असे आदेश पाणीपुरवठा विभागाला आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी दिले