कॉंग्रेसच्या मागणीला सकल जैन समाजाचा विरोध, पुणे बसस्थानक ते आनंदधाम रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी

0
463

ahmednagar anandham.. नगर -कॉंग्रसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील पुणे बसस्थानक ते धार्मिक परीक्षा बोर्ड दरम्यानच्या रस्त्यासाठी मंजूर साडेचार कोटींच्या निधीला हरकत घेत सदर रस्ता सुस्थितीत असल्याने सदर कामाची निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र आता शहरातील सकल जैन समाजाने कॉंग्रेसच्या या मागणीमागे राजकारण असल्याचे सांगत सदर रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय संत आचार्य आनंदऋषीजी मा.सा. समाधी स्थळ हे तिर्थक्षेत्र असून देश व परदेशातून मोठ्या संख्येने भाविकभक्त दर्शनासाठी येत असतात. या तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. भाविकांची येण्याजाण्यासाठी सोय व्हावी तसेच या परिसराच्या सुशोभिकरणास भर पडल्यास देशभरातून आलेले भाविक अहमदनगर शहराबद्दल आपुलकीने विचारपुस करतील व आपल्या शहराबद्दल त्यांच्या मनात आस्था निर्माण होतील. या परिसरातील विकास कामाच्या मॉडेलच्या माध्यमातून आपल्या शहराची ओळख विकसित शहर म्हणून ओळखली जाईल,यासाठी राष्ट्रीय संत आचार्य आनंदऋषीजी मा.सा. यांचे समाधी स्थळ ते पुणे बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यासाठी शासनाकडून मोठा निधी प्राप्त झाला आहे. तरी हे काम लवकरात-लवकर सुरू करावे अशी मागणी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे सकल जैन समाज,जितो अहमदनगर व सकल राजस्थानी युवा मंच यांच्यावतीने करण्यात आली आहे.

तरी या कामाकरिता पक्षीय राजकारण वैयक्तिक हेवेदावे बाजुला ठेऊन सर्वांनी एकत्र येऊन सदर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी जैन समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा,नगरसेवक विपुल शेटीया,धनेश कोठारी,अमित मुथा, प्रितेश मुथा, महेश बोरा,आशिष गांधी, महाविर कांकरिया, राहुल मनियार,सुशील ओस्तवाल, अनिकेत कौर, महेश भळगट, सचिन चोपडा, उमेश बोरा, आनंद गांधी, आनंद नहाटा, प्रवीण शिंगवी, ईश्वर पोखरणा, रितेश पटवा, प्रशांत मुथा, धीरज सुराणा, कमलेश पितळे, पियुष लुंकड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.