नगर – भिंगार अर्बन बँकेवर भृंगऋषी पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. भिंगार अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रविवारी मतदान झाले. यामध्ये 67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 6989 पैकी 4749 जणांनी मतदान केले. या निवडणुकी विद्यमाने चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंगऋषी पॅनेल व माजी चेअरमन स्व.गोपाळराव झोडगे यांच्या पत्नी शारदाताई झोडगे यांच्या नेतृत्वाखाली बेलेश्वर पॅनलने उमेदवार उभे केले होते.
रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इंद्रायणी लॉन येथे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. यामध्ये भृंगऋषी पॅनेलचे 15 पैकी 15 उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले.
विजय उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट – कैलासराव खरपुडे (2825), माधव गोंधळे (2920), किसनराव चौधरी (3140), महेश झोडगे (3303), कैलास दळवी (2747), अमोल धाडगे (2947), राजेंद्र पतके (2793), विष्णू फुलसौंदर (2912), रुपेश भंडारी (2820), कैलास रासकर (2629). इतर मागावर्गीय – अनिलराव झोडगे (3301). वि.जा.भ.ज. – नामदेव लंगोटे (3375), अनुसूचित जाती-जमाती – एकनाथ जाधव (3174), महिला राखीव – तिलोत्तमा करांडे (2583), अनिता भुजबळ (2946) आदिं उमेदवार विजयी झाले.