नगर  – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे व शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचा सत्कार करताना भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे समवेत अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष रियाज कुरेशी, सचिन जाधव, रोहन शेलार, नाना गाडे, संदेश रपारिया, आसिफ सय्यद, सागर अल्हाट आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
                                                                                यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्च्याच्या शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे म्हणाले की नवनिर्वाचित निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकारी एकत्र पणे जिल्हा व शहरात विकास कामे करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत जिल्हा व शहरासाठी मोठा निधी उपलब्ध करून शहराच्या विकासासाठी तसेच शहरात जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला खड्डे मुक्त शहर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नगर शहराच्या खड्ड्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न देखील करणार असल्याचे सांगितले तर सत्काराला उत्तर देत अनिल शिंदे म्हणाली की जिल्ह्यासह शहरात देखील शिवसेना मोठ्या प्रमाणात विकासाचे कामे करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 






