विक्रम राठोड यांची खासदार विखे पाटलांवर टीका
नगर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाने आज अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर श्रीफळ वाढवून उद्घाटन केलं. यावेळी युवा नेते विक्रम_राठोड यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्यावर जाेरदार टीका केली. “खासदार विखे पाटील यांना ज्या शिवसेनेनं शहरात आेळख दिली तिलाच ते विसरले आहेत. ज्यांनी उड्डाणपुलाला विराेध केला त्यांनाच बराेबर घेऊन उड्डाणपुलाचे श्रेय लाटत आहेत, हे डबल गेम नगरकर विसरणार नाहीत. उड्डाणपूल पूर्ण हाेण्यामागे खरं याेगदान नगरकरांचं आहे. याशिवाय या पुलासाठी शिवसेनेचे उपनेते स्व.मा.राज्यमंत्री आमदार अनिलभैय्या राठोड यांनी आंदाेलन केले हाेते, तर माजी खासदार दिलीप गांधी यांनी केंद्राकडे माेठा पाठपुरावा केला हाेता,” याची आठवण विक्रम राठाेड यांनी यावेळी करून दिली.
विक्रम_राठाेड म्हणाले, “अहमदनगर शहरातील या उड्डाणपुलासाठी १२ वर्षांपासून अनिल भैय्या राठोड आणि दिलीप गांधी यांनी पाठपुरावा केला हाेता. त्यावेळी उड्डाणपुलाला १८ काेटी रुपये लागत हाेते. आता हा उड्डाणपुलावर २५६ काेटी रुपये खर्च झाला आहे. या उड्डाणपुलासाठी अनिल भैय्या राठोड यांनी आंदाेलन केले. राठाेड यांच्याबराेबर दिलीप गांधी यांनी उड्डाणपुलासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला. त्यामुळे पुलाचा खरा पाया शिवसेना-भाजपने घेतला आहे. आताचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी देखील पुलासाठी हातभार लावला आहे. परंतु हा पूल उभारण्यात शिवसेनेचा माेठा वाटा आहे”. हा पूल दहा वर्षे अगाेदरच व्हायला हवा हाेता. ताे १२ वर्षानंतर हाेताे आहे. हे असं का झालं हे नगरकरांना चांगलं माहित आहे.