कोतवाली पोलीस स्टेशन
गुन्हा रजिस्टर क्रमांक 369 /2023 भादवी कलम 307, 326, 324, 504, 506, 34, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) 135 प्रमाणे
फिर्यादी – दीपक रमेश नवलानी राहणार – सावेडी अहमदनगर
आरोपीचे नाव – 1)अमर हमीद शेख
2) रिजवान अमिन सय्यद राहणार – पाच लिंब गल्ली कापड बाजार अहमदनगर ( अटक )
3) हमजा शौकत आली शेख व त्याचा धाकटा
4) आरोपी क्रमांक 3 चा भाऊ फरार
राहणार – मोची गल्ली, अहमदनगर
गुन्हा घडला दि. – 14 /04 /2023 रोजी दुपारी 3 ते 5 :15 वाजता
ठिकाण – एमजी रोड, शहाजी चौक, कापड बाजार, अहमदनगर
गुन्ह्यातील हत्यार – धारदार शस्त्र
हकीगत – वरील ठिकाणी हमजा शौकतआली शेख याने त्याचे बांगडीचे दुकानाजवळ स्वतंत्र बॅरिकेटिंग केले होते, व तक्रारदार यांना दुकानात जाण्या-येण्या करिता अडथळा येत असल्याने त्याला सदरचे बॅरिकेटिंग (गेट) काढून घेण्यास सांगितले असता त्याचा राग आल्याने आरोपी व त्याचा धाकटा भाऊ यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी सोबत भांडण करायला जवळ कुलपाचे दुकान असलेला रिजवान अमीन सय्यद हा देखील आला व त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. 5 :15 वाजण्याच्या सुमारास सिद्धी किडस या दुकानासमोर फिर्यादी व त्याचे मित्र प्रणील बोगावत हे गप्पा मारत उभे असताना रिजवान अमिन सय्यद याचा जावई अमार हमिद शेख हा त्यांच्याकडे जाऊन शिवीगाळ करून फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे असलेला धार धार शस्त्राने फिर्यादीच्या छातीवर आणि पोटावर चार ठिकाणी वार करून गंभीर दुखापत केली आहे व साक्षीदार प्रवीण बोगावत याचे सुद्धा हातावर वार केले आहेत. आरोपी 1) अम्मार अमित शेख, 2) रिजवान अमित सय्यद, 3) हमजा शेख व 4) त्याचा धाकटा भाऊ याचे सांगण्यावरून दमदाटी करून जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने फिर्यादीचे पोटावर मारून गंभीर दुखापत केली आहे वगैरे मजकूर च्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.