मिरवणूक मार्गातच शिंदे गटातील मंडळ उभे असल्याने शिवसेनेच्या मंडळाला पुढे जाण्यास पुरेशी जागा नव्हती, त्यामुळे डाळ मंडईतील एका इमारतीच्या गॅलरीला शिवसेनेच्या सिडीचे सेट दोन-तीन वेळा चिटकले. ती इमारत अतिशय जुनी होती, परंतु तिला काही धक्का न लागल्याने सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. मात्र या संघर्षामध्ये नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी काही जणांना धक्काबुक्की होण्याचे प्रकारही घडले. दाळमंडईतील बेसमेंटमधील एका बंद दुकानासमोर गर्दीचा धक्का लागल्याने तीन ते चार महिला खाली पडून जखमी झाल्या. दरम्यानच्या काळात शिवसेनेकडून शहरप्रमुख संभाजी कदम, अभिषेक कळमकर, सचिन शिंदे, विक्रम राठोड तर शिंदे गटाकडून अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव, संग्राम शेळके यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व तोफखान्याच्या पोनि. ज्योती गडकरी यांच्याशी झालेल्या वादाबाबत दीर्घकाळ चर्चा केली. पोलिस अधिकार्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात येत होती, त्याच पद्धतीने यावेळी मंडळांना त्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेत शिवसेनेच्या मंडळाला 13 व्या नंबरला सहभागी होण्याची संधी देवून या वादावर अखेर पडदा टाकला.
Video by- Vikram Bankar






