Ahmednagar Breaking
नगर जिल्ह्यामधून पहिला शिवसैनिक पुढे येत ‘मी देखील एकनाथ शिंदे’, असे म्हणाला आहे. नगरसेवक मदन आढावयांनी म्हटले आहे, मी कडवा शिवसैनिक आहे. धर्मवीर अनिलभैय्या राठाेड यांच्या हिंदुत्वाच्या तालमीत तयार झालाे आहे. हिंदुत्वाची काेणतीही तडताेड करणार नाही. परंतु आमच्या विठ्ठलाला म्हणजे पक्षप्रमुपख उद्धव ठाकरे यांना बडव्यांनी घेरलं आहे. त्याची परिणाम म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून शिवसेना संपली आहे”. अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ काेरेगांवकर यांनी शिवसेना संपवली आहे. धर्मवीर दिवंगत शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठाेड यांना देखील खूप त्रास दिला. ताे आता बाेलवून दाखवणार नाही. परंतु ताे वेळ आली की सांगेल.
बडव्यांवर ताेंडसुख घेताना नगरसेवक मदन आढाव यांनी मी कट्टर शिवसैनिक असून, हिंदुत्वाशी काेणतीही तडजाेड करणार नाही, असे सांगितले. याशिवाय ही बंडखाेरी नाही. मी सच्चा शिवसैनिक आहे. त्यामुळे याला काेणीही बंडखाेर म्हणू नये, असेही मदन आढाव यांनी स्पष्ट केले.