शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराचा विषय चर्चेला जात असताना जिल्ह्याचे नामांतर महात्मा फुले नगर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या शहराशी फुले दांम्पत्यांनी चालवलेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीचा इतिहास जोडला गेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, प्रा. माणिक विधाते, अमित खामकर, पंडितराव खरपुडे, विष्णुपंत म्हस्के,बजरंग भुतारे, आशिष भगत, लवेश गोंधळे, किरण जावळे, संतोष हजारे, विश्वास शिंदे, गणेश बोरुडे, सचिन गुलदगड, लहू कराळे, महेश सुडके, विशाल सुडके, शुभम फलके, आकाश डागवले, महेश गाडे, अनिकेत आगरकर, सचिन आगरकर, अशोक आगरकर, सागर चवंडके, विजय नामदे, प्रथमेश आगरकर, सुमित तागड, विनीत डागवाले, गणेश बनकर आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानणारा समाज वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वर्षापासून जिल्ह्याचे नामांतर महात्मा फुले नगर होण्याबाबत समाजाच्या विविध वर्गांमधून मागणी होत आहे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण व समाज सुधारणा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन नुकतेच अहमदनगर महानगरपालिकेद्वारे माळीवाडा परिसरमध्ये थोर समाज सुधारक दांपत्याचे पूर्ण कृती पुतळा उभारण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण सन 1846-47 दरम्यानच्या कालावधीमध्ये अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रूस हायस्कूल प्रशालेमध्ये झाले. सावित्रीबाई फुले यांचे मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य समाज आजही आदर्श मानले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अहमदनगर शहरातील फुले दांपत्यास आदर्श मानणारे नागरिक व रहिवाशांच्या मागणीनुसार फुले ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्ह्याचे नामंतर महात्मा फुले नगर करण्याबाबत योग्य प्रस्ताव शासनास सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.