Tuesday, April 30, 2024

आयुक्त पंकज जावळे यांनी दुचाकीवर केली शहर स्वच्छतेची पाहणी ,युनिफॉर्म नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड

नगर : शहरांमधील रस्त्यांच्या बाजूला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सकाळी अचानकपणे दुचाकीवर शहरात फेरफटका मारत शहर स्वच्छतेची पाहणी करत नाराजी व्यक्त केली, या पुढील काळात नगर शहरातील स्वच्छता 100% झाली पाहिजे व कचऱ्याचे संकलन देखील पूर्ण क्षमतेने उचलले गेले पाहिजे अन्यथा अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल असा कामचुकार कर्मचाऱ्यांना सज्जड इशारा देत आयुक्त जावळे यांनी कारवाईचे संकेत दिले. तसेच युनिफॉर्म न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. यावेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत .शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असून नागरिकांनी देखील ओला व सुखा कचरा घंटा गाडीतच टाकावा महापालिकेच्या विरोधात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास स्वच्छता निरीक्षक विभाग प्रमुख यांच्या कडे नोदवावी. निश्चितच त्याचे निराकरण केले जाईल. अशी माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दुचाकीवर शहर स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
चौकट आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दुचाकीवर स्वच्छतेची पाहणी करत असल्याची माहिती अधिकारी कर्मचारी यांना झाल्यानंतर सफाई कर्मचारी ठिकठिकाणी रस्त्यावर साफसफाई करत असल्याचे दिसत होते.
आयुक्त पंकज जावळे यांनी कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरत आपल्या कामाची, जबाबदारीची जाणीव करून दिली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles