Tuesday, May 28, 2024

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

भाजपच्या वाटेवर असलेलले एकनाथ खडसे यांना यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता.धमकीचे कारण अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहे. वेगवेगळ्या नंबरवरुन खडसेंना धमकीचे फोन आले आहेत. विविध देशातून फोन येत असल्याची एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.धमकीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या दोन दिवस पासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं खडसे यांनी म्हटल आहे. विदेशातून हे कॉल येत असावे असा अंदाज खडसे यांनी व्यक्त केला असून पोलिस आता त्याचा तपास घेत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles