प्रतिनिधी : शहरात काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या “महासंकल्प मेळावा – लक्ष विधानसभेचे” यामध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. यावेळी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी इंजि.सुजित क्षेत्रे यांची तर काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी गौरव घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे व युवा उद्योजक ओंकार पाटील यांनी आपल्या कार्यकर्ते, समर्थकांसह काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. निलेश लंके, आ. लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, दशरथ शिंदे, सुनील क्षेत्रे, संजय गारुडकर सर, अभिनय गायकवाड, स्वप्निल पाठक, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, उषा भगत, आशा लांडे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, किशोर कोतकर, चंद्रकांत उजागरे, गणेश चव्हाण, अल्तमश जरीवाला, माजी नगरसेवक फारुख शेख, फैयाज केबलवाले, शम्स खान, शंकर आव्हाड, गणेश आपरे, अशोक शिंदे, कैलास शेवाळे, करण ससाणे, किरण पाटील, सचिन गुजर आदींची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, शहरातील महायुतीतील घटक पक्षांमधील अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी त्यांचे मोठे बळ मिळणार आहे. राजकारणात सर्वच पत्ते ओपन करायचे नसतात. आगामी विधानसभेत शहरातील अनेक कार्यकर्ते विरोधकांच्या व्यासपीठावर दिसतील मात्र ते आत्तापासूनच आमच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. लोकसभेतही हेच झाले होते. शहरात महाविकास आघाडी अभेद्य असून शहरात शतप्रतिशत परिवर्तन होणार आणि नगर बदलणार असा ठाम विश्वास यावेळी किरण काळे यांनी व्यक्त केला.






