कॉंग्रेसची लोकसभेसाठी तयारी, नगरच्या विनायक देशमुख यांच्यावर मोठी जबाबदारी…

0
29

*रावेर लोकसभा मतदारसंघासाठी*
*समन्वयकपदी विनायक देशमुख*
————————————————–
*मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार रावेर लोकसभा मतदारसंघ समन्वयकपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. विनायकराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे*.
*यासंदर्भात राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक दि.३ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथे संपन्न झाली.या बैठकीत ठरल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक नियुक्त करण्यात आले असुन जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री विनायकराव देशमुख यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे*.

*तसेच या मतदारसंसाठी डॉ.सुनील देशमुख यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*

*यासंदर्भात आपण लवकरच रावेर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचे श्री. विनायकराव देशमुख यांनी सांगितले*