नगरमध्ये चार वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार प्रकरण, मारहाणीत आरोपीचा मृत्यू

0
879

अहमदनगर : एका चार वर्षाच्या बालकावर घरी नेऊन अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली होती. या घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला बेदम चोपले होते. या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला होता. आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतर गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजेश सोनार असे आरोपीचे नाव आहे. बालकावर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मृत्यूप्रकरणी चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केले आहे.
लहान मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आरोपीला बेदम चोपल्याची घटना सोमवारी घडली होती. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी गंभीर झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र चार दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पीडित मुलाच्या आईने MIDC पोलीस ठाण्यात सोनार यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली होती. त्यात आरोपी गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला. आरोपीच्या मृत्यूप्रकारणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.