नगर-युवकाने (वय 17) अल्पवयीन भाऊ-बहिणीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील उपनगरात घडली आहे. पीडित भाऊ-बहिणीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून युवकाविरूद्ध अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 ऑगस्टला दुपारी ही घटना घडली. उपनगरात राहणार्या फिर्यादी यांना सहा वर्षाचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी आहे. ते दोघे शाळेत जातात. 27 ऑगस्टला शनिवारी फिर्यादीच्या मुलांना सुट्टी असल्याने ते घरीच होते. दुपारी युवकाने फिर्यादीच्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांचा क्लास घेतो, असे सांगून त्याच्या राहत्या घरी बेडरूममध्ये बोलवून घेतले. सुरूवातीला मुलीला बेडरूममध्ये ठेऊन मुलाला बाहेर काढून दिले. मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. यानंतर मुलाला बेडरूममध्ये बोलून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. कोणाला काही सांगितल्यास तुमच्यासह तुमच्या आईला मारून टाकेल, अशी धमकी दिली होती.
शनिवारी दि. 10 सप्टेंबरला तो युवक फिर्यादीच्या घरी त्यांच्या मुलांना बोलावयला आला. परंतु फिर्यादीच्या मुलांनी त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. फिर्यादीने दुसर्या दिवशी रविवारी 11 सप्टेंबरला युवकासोबत न जाण्याचे कारण मुलांना विचारले असता त्यांनी घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करीत आहेत.






