पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरुन दोघांना बेदम मारहाण, नगर शहरातील घटना…

0
1036

नगर- पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरुन दोघा युवकांना तीन जणांनी लाकडी दांडके तसेच लोखंडी गजाच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.९) रात्री ७.३० च्या सुमारास काटवन खंडोबा रोडवर घडली.
याबाबत सागर शाम घोगरे (रा.संजयनगर, काटवन खंडोबा) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घोगरे व त्याचा मित्र प्रविण शिमोन जगताप हे दोघे रविवारी सायंकाळी ईद-ए-मिलादची मिरवणुक पाहण्यासाठी नगर शहरात आले होते त्यानंतर ते पुन्हा घरी जात असताना रात्री ७.३० च्या सुमारास त्यांच्या ओळखीचे सुनील जितसिंग जुन्नी, सदनाम जितसिंग जुन्नी, सागर जुन्नी (रा.संजयनगर, काटवन खंडोबा) यांनी या दोघांना अडवले व तुम्ही पोलिसांना आमच्या खबरी का देता, अशी विचारणा केली. त्यावेळेस आम्ही काहीही केलेले नाही, असे फिर्यादी सांगत असताना तिघा जणांनी फिर्यादी व त्याचा मित्र यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी टणक वस्तुने बेदम मारहाण केली.
याबाबत सागर घोगरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध भा.दं.वि.क. ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.