नगरमधील उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या कुंटनखाण्यावर पोलिसांचा छापा!

0
3641

अहमदनगर उपनगर मधील तपोवन रोड भागात असणाऱ्या सूर्य नगर परिसरात एका बंगला चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून तीन महिलांसह काही पुरुषांना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पक्षाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्याचे कारवाई सुरू आहे . शहरातील सूर्य नगर भागात एका घरामध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक नंदुरकर महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्चना काळे हेड कॉन्स्टेबल अनिता पवार, पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवन पोलीस कॉन्स्टेबल लोहाळे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश बोरकर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण करडुले,पोलीस कॉन्स्टेबल तैसिन शेख या कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.