सोलापूर जिल्ह्यात धनगर आरक्षण कृती समितीचे शंकर बंगाळे या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. मात्र या प्रकारानंतर तेथे उपस्थित विखे समर्थक कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना मारहाण केली. या मारहाणीचा नगर जिल्ह्यातील धनगर समाजाने निषेध केला आहे. पोलिसांसमक्ष ही मारहाणा झाली असून संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा बंदचा इशाराही देण्यात आला. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला हे निवेदन दिले आहे.
समाजातर्फे काका शेळके, सचिन डफळ, राजेन्द्र तागड, अध्यक्ष धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष निशांत दातीर, भगवान जऱ्हाड, अशोक होंनमने, केदार हजारे, संग्राम शेळके यांनी हे निवेदन दिले आहे.