नगर शहरातील भाजपा राष्ट्रवादी यांच्या छुप्या युतीमुळे, उड्डाणपुलावरील ते काम राहिले !

0
31

नगर शहरातील भाजपा राष्ट्रवादी यांच्या छुप्या युतीमुळे, उड्डाणपुलावरील ते काम राहिले मनसेचा गंभीर आरोप !
शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला याचे चित्र उड्डाण पुलाच्या पिलरवर का काढले नाही याचे उत्तर खासदार सुजय विखेंनी द्यावे… नितीन भुतारे

भाजप राष्ट्रवादीची छुपी युतीतील मतांच्या राजकारणासाठी अफजखानाच्या वधाचा प्रसंग उड्डाण पुलाच्या पिलरवर रेखाटला नाही.

खासदार आमदारांचा मिळुन एक कोटी निधी खर्च करून शिवाजी महाराजांचा इतिहास चित्ररुपी या उड्डाणपुलाच्या पिलरवर साकारला मग अफजखानाच्या वधाचे चित्र का साकारले नाही याचे उत्तर खासदार सुजय विखे यांनी देणे गरजेचे आहे
या सर्व ८७ पिलरवर शिवाजी महाराजांचा जीवनपट इतिहास रेखाटला आहे परंतु अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला हा प्रसंग चित्र रेखाटले नाही त्यामुळे महाराजांचा हा जीवनपट इतिहास अधुरा दिसत आहे. असे मनसेचे नितीन भुतारे यांनी सांगितले उड्डाण पुलाचे श्रेय भाजपचे खासदार सुजय विखे यांनी घेतले त्यामुळे याचे उत्तर सुध्दा खासदारांनी देणे गरजेचे आहे. अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे. नगर शहरातील भाजप राष्ट्रवादीची छुपी युती आहे. त्यामुळें मतांच्या राजकारणासाठी हा अफजलखानाच्या वधाचा प्रसंग उड्डाण पुलाच्या पिलरवर रेखाटला नाही असा आरोप मनसेचे नितीन भुतारे यांनी केला आहे खासदार आणि आमदार यांनी लवकरात लवकर अफजखानाच्या वधाचा प्रसंग उड्डाण पुलाच्या पिलरवर साकारावा चित्र रेखाटले पाहिजे ही तमाम शिवप्रेमींन ची भावना आहे व जर स्वतंत्र भारतात अफजखानाच्या वधाच्या चित्राला जर कोणी विरोध करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.
आपला नम्र
नितीन भुतारे
मनसे जिल्हा सचिव
अहमदनगर