केंद्र सरकारच्या निधीतून होणारे रस्ते व पुलांना नाव देण्याची प्रथा नाही व तशी नॅशनल अॅथॉरिटीकडून परवानगीही नसते. त्यामुळे नगरच्या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे असेल तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे लेखी मागणी करावी लागेल व त्यावर अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील. हा उड्डाणपूल अहमदनगर शहरात होत असल्याने या पुलाला अहमदनगर उड्डाणपूल असे जिल्ह्याचे नाव देण्यात काहीच वाईट नाही. पण पुलाचे नाव काय असावे, याबाबत माझे कशाला समर्थनही नाही व विरोधही नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले. या पुलाला ८६ खांब असल्याने या सर्व खांबांना महापुरुषांची नावे दिली, तरी माझी हरकत नाही, असेही खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.