चर्चा तर होणारच !तोतया ‘दादांच्या’ पीएचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केला भांडाफोड

0
25

नगर : जिल्हा परिषदेत तोतयांचा वावर वाढला आहे. कृषी विभागानंतर समाज कल्याणमधील ‘प्रकरण’ ही चर्चेत असताना काल एका युवानेत्याने मी दादांचा पीए असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना धारेवर धरल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, याबाबत काही कर्मचाऱ्यांनी आपल्या माहितीतील ‘पीए’कडे विचारणा केली असता, या नावाचा पीए नेमलाच नसल्याचे पुढे आले.दुपारी तीन वाजेच्या दरम्यान एका ठेकेदाराने ‘त्या’ तरूणाला सोबत आणले होते. संबंधित तरुणाने मी दादांचा पीए असून, या ठेकेदाराचे बील का अडवले,याची विचारणा करतानाच ‘लावू का
‘त्याने’ धरले धारेवर फोन’ असे सांगून कर्मचाऱ्यांनाच दरडावले. मात्र कर्मचाऱ्यांनी बिल काढण्यासाठी आलेल्या अडचणीही विशद केल्या. मात्र तो पीए थांबायचे नाव घेत नव्हता.अखेर काही कर्मचाऱ्यांनी आपल्या संपर्कातील एका पीएला फोन लावून,माहिती घेतली असता अशा नावाचा
दादांचा एकही पीए नसल्याचे समजले.आम्हीच दादांना फोन लावतो आणि तुमचा पीए येथे आला आहे, अशी माहिती देतो, असे कर्मचाऱ्यांनी
सांगताच, माफ करा, मी दादांचा पीए नाही, कार्यकर्ता आहे, असे सांगून त्याने काढता पाय घेतला. हा कार्यकर्ता कोण, तो ठेकेदार कोण, याविषयी काल दिवसभरही चवीने चर्चा सुरू होती