नगरमधील कापड बाजार येथील व्यापाऱ्यांच्या मुद्द्यासह अनेक हिंदुवत्वादी मुद्दे गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगर : १८ जुलै रोजी पासून मुंबईत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनास सुरवात होत आहे. या अधिवेशनात प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी च्या माध्यमातून अहमदनगर शहरातील मुख्य बाजार पेठेतील वादग्रस्त झालेल्या अतिक्रमण आणि पथविक्रेत्यांचा प्रश्ना संदर्भात सूत्रांचा माहिती नुसार हा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनधिकृतरित्या सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करून अतिक्रमण करणाऱ्या हातगाडी धारक, पथारीवाले यांच्याविरुद्ध थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रार करण्यात आलेली असताना देखील त्याबाबत कुठल्याही प्रकारची संधी न देता, सुनावणी न घेता सदर प्रकरण थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवून प्रकरण निकाली काढण्याचा घाट अहमदनगर महापालिकेच्या नगर रचना व अतिक्रमण निर्मूलन विभाग यांनी मा.आयुक्त यांच्या मदतीने करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक 12 मार्च 2022 रोजी कापड बाजारातील व्यापारी व हातगाडी धारक यांच्यात झालेल्या वादावरून त्रस्त झालेले शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड बाजार, गंज बाजार, मोची गल्ली, सारडा गल्ली, राजे शहाजी भोसले रस्ता या गजबजलेल्या भागातील व्यापारी भयंकर रित्या सदर अतिक्रमण धारक हातगाडीवाले व पथारीवाले यांच्या जाचास वैतागलेले असून कोणत्याही क्षणी पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा व सनदशीर मार्गाने उपोषणास बसण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने केलेला असून त्याबाबत मा. आयुक्त यांना दिनांक 25 एप्रिल व त्या सुमारास निवेदन देण्यात आलेले आहे असे समजते. तसेच व्यापाऱ्यांना धमकावण्याचे व त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी रेखी केल्या जात असल्याबाबतचा प्रकार तसेच व्यापाऱ्यांच्या हक्काच्या व्यवसायाचे ठिकाणांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध खोट्यानाट्या अतिक्रमणाच्या तक्रारी देण्याचा व त्यांच्यावर खोटे व चुकीचे आरोप करून त्यांचा आवाज शमविण्याचा ही प्रयत्न केला जात असल्याबद्दल ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव, उपविभागीय आयुक्त व अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मा. आयुक्त, पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनात व्यापाऱ्यांनी आणून दिले आहे. तरीदेखील मनपा मार्फत स्वतः आयुक्त ह्यांनी मा. महापौर मनपा व पोलिस पदाधिकारी कर्मचारी व सर्व पक्षांच्या शहर जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्व व्यापाऱ्यांच्या समक्ष सदर हातगाडीवाले व पथारीवाले ह्यांच्यावर सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देऊनही कुठलीच ठोस स्वरुपाची कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करत आता मुंबईतील शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला असून पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच सदर गजबजलेल्या व्यापार पेठेतील व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांच्या दुकानांसमोर कुठले ही हातगाडी व पथारीचे अतिक्रमण खापवून घेतले जाणार नाही ह्या संबंधी मोठ्या संख्येने हरकत तक्रार अर्ज मनपात आयुक्तांकडे दखल केल्याने तसेच बाजारपेठेतील दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच याठिकाणी येणाऱ्या ग्राहक व नागरिकांनी देखील सदर अतिक्रमण करणाऱ्या हातगाडी व पथारीवाल्यांबाबत तक्रारी केल्याने येणारे अधिवेशन हे नगरच्या मुद्द्यांवरून चांगलेच गाजणार असल्याचे समजते.