अहमदनगर कापड बाजारात नामांकित व्यापाऱ्याच्या दुकानात धारदार शस्त्रचा साठा जप्त…

0
47

कॉस्मेटीकच्या दुकानात तलवारी, नगरच्या मोची गल्लीत पोलिसांची कारवाई

अहमदनगर शहराच्या बाजारपेठेतील मोची गल्ली भागात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या. या तलवारी दुकानात विकण्यासाठी ठेवल्या होत्या, की अन्य उद्देशाने याचा तपास पोलिस करीत आहेत. मालक नंदकिशोर मोडालाल बायड (वय ५३) याला पोलिसांनी अटक केली आहे.कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.