बनावट सौंदर्य प्रसाधने विकणार्या दोन दुकानदारांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माधराम पताराम चौधरी (वय 33), रतनसिंह गुलाबसिंह राजपूत (वय 30, दोघे रा. विनायकनगर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झाल्या आरोपींची नावे आहेत. मुंबईतील नेत्रिका कन्स्लटंट कंपनीच्या विविध सौंदर्य प्रसाधने आहेत. या सौंदर्य प्रसाधनांच्या नावाने बनावट उत्पादने तयार करण्यात आले आहेत. त्या उत्पादनांची नगर शहरात विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली.
कंपनीचे प्रतिनिधी मेहूल हरिशचंद्र घोले (वय 47, रा.दादर, मुंबई), सहकारी भुपेंद्र जगदिश मकवाना (वय 47, रा. मुंबई), सुनील रत्नप्पा पुजारी (रा. मालाड, मुंबई) यांनी कोतवाली पोलिसांच्या मदतीने आशा टॉकीज चौकातील महालक्ष्मी इमिटेशन ज्वेलरीफ तसेच माँ नागणेची नॉव्हेल्टी या दुकानांची तपासणी केली. यामध्ये कंपनीच्या नावाचे बनावट सौंदर्य प्रसाधने आढळून आले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन्ही दुकानाचे मालक माधराम पताराम चौधरी (वय 33), रतनसिंह गुलाबसिंह राजपूत (वय 30, दोघे रा. विनायकनगर, नगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.