Home नगर जिल्हा नगरमधून दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार, म्हणाले…

नगरमधून दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार, म्हणाले…

0
18

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन निलेश लंके नावाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावरुन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करुन सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.