नगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र अजून पर्यंत त्याला यश आले नाही, आता जालना येथील मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा देऊन  आरक्षणाचा लढा तीव्र करावा. राज्यात मी पहिला आमदार म्हणून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य सरकारमध्ये सर्वच पक्ष सामील झाले आहे. मात्र मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही आरक्षणासाठी तालुका तालुक्यात आंदोलन होणे गरजेचे आहे. सरकारच्या विरोधात आरक्षणासाठी दोन हात करू छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य निर्माण केले आता आरक्षणासाठी एकच झेंडा स्वराज्याचा भगवा झेंडा हाती घेऊन आरक्षणासाठी आपण सर्वजण लढा उभारू, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
  जालना येथील मराठा बांधवांवर झालेला लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कायनेटिक चौकी ते रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब पवार, दगडू मामा पवार, गणेश कवडे, मनोज कोतकर, निखिल वारे, कुमारसिंह वाकळे, विनीत पाऊलबुद्धे, माऊली जाधव, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, गोरख दळवी,अभिजीत खोसे,  प्रा. अरविंद शिंदे, राजेंद्र ससे, निलेश म्हसे, दत्ता खैरे, सुरेश इथापे, अजित कोतकर, संभाजी पवार, विशाल पवार, दत्ता मुदगल,  शिवाजी कराळे, शिवाजी सांगळे, रेश्माताई आठरे, डॉ अनिल आठरे, अनुराधा येवले, अंजली आव्हाड, राजेंद्र काळे, युवराज शिंदे, दीपक लांडगे, सुरत शेळके, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, विजय सुंबे, सोनू घेमुड, मंगेश खताळ आदी उपस्थित होते
गोरख दळवी म्हणाले की, 147 मराठा राज्यकर्त्यांनी अधिवेशनात व संसदेत आवाज उठून मराठ्यांच्या आरक्षणासाठी पुढे यावे तुम्हाला 31 दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भाग घेता येणार आहे. त्यानंतर तुमच्या विरोधातच आंदोलने केली जातील आम्ही आता कायद्याने लढाई लढवणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी लाखो मराठ्यांना एकत्र केले आहे आम्ही आता आमच्या हक्कासाठी लढाई उभारू असे ते म्हणाले
            राजेंद्र काळे म्हणाले की, जरांगे पाटलाची ३०  दिवसाची मुदत 13 ऑक्टोंबर ला संपत आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्या दिवशी पितृ अमावस्या असून सर्व  राजकीय पुढार्यांचे पितृ  घालण्यात येणार आहे. व 14 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे असा इशारा यावेळी दिला..






